Friday, 10 August 2012


आजची रात्र झोपूया नको
चांदण्या मोजू, coffee पिऊन
करू घरातच night lamp चा डिस्को
पण खरच आज झोपूया नकोमीच विचारीन प्रश्न, उत्तर देईन मीच
तू बोलशील तेव्हा करणार नाही मधे मिचमिच
तू पी चहा हवा तर, मी पण घालीन दुधात कोको
पण आज खरच झोपूया नको...


 तू शांतच रहा हव तर, पण फोन कट करू नकोस
नको disturbance ची खरखर, range गेली तर परत call कर
मी उद्या फोनमध्ये balance भरेन नक्की, तू काळजी करू नकोस
पण बोलत राहू, झोपुयात नको, कारण तस नाही काही ठोस...सहजच वाटतंय बोलावसं
गरम आहे अंग, वाटतंय जरा कससं
तू नाहीस इथे म्हणून एकट वाटतय
असा गैरसमज करू नको  

ए... पण please आजची रात्र, झोपूया नको! 
1 comment:

  1. I dont remember when i read such a fodu poetry last time :)

    ReplyDelete